मनाचे स्थान नेमके कोणते याचा विचार केल्यास त्याचे कार्य काय याचाही किंचित उलगडा होऊ शकतो. मनाच्या स्थानाचे थेट वर्णन भगवद्गीतेत सापडते. गीतेतील तिसºया अध्यायातील ४२ व्या श्लोकात सूक्ष्म इंद्रियांची क्रमवारी वर्णन केली आहे. क्रमवारीत सर्वात निम्न स्तरावर इंद्रिये आहेत. त्यांचे कार्य सर्वात कनिष्ठ दर्जाचे असते. मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे.
मनाहून श्रेष्ठ बुद्धी आहे, तर त्याहून आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. या क्रमवारीत आत्म्याचे स्थान सर्वोच्च आहे. म्हणजेच, मनाचे स्थान इंद्रिये व बुद्धी यांच्या दरम्यान आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, मन हे इंद्रिय व बुद्धी यांना जोडण्याचं काम करते. तराजूची कल्पना केल्यास, पारड्यात एका बाजूला इंद्रिये, तर दुसºया बाजूला बुद्धी असते व तराजूच्या बरोब्बर मध्यभागी मन असते. यावरून आपण इतका अंदाज लावू शकतो कि, मनाचे कार्य इंद्रियांहून श्रेष्ठ दर्जाचे परंतु बुद्धीशी तुलना करता कमी दर्जाचे आहे.
मनाचे काम समजून घेण्यासाठी आपल्याला मनाबरोबरच इंद्रिये व बुद्धी यांचाही विचार करावा लागेल. इंद्रिये बहिर्मुख असतात. भौतिक सृष्टीतील निरनिराळ्या गोष्टींशी इंद्रियांचा संपर्क येतो. बाह्य सृष्टीतील या गोष्टींनाच विषय असे संबोधतात. या विषयांशी संबंध आल्यावर ज्ञानेंद्रिये त्याची माहिती मनाला देतात. त्यावरून मन आवड झ्र निवड ठरवते. या आवडी-निवडीनुसार मन ती माहिती बुद्धीसमोर मांडते. तकार्ला अनुसरून बुद्धी त्यावर कर्म अ कर्माचा (एखादी क्रिया करावी कि करू नये याचा) निर्णय घेते व तो मनाला सांगते. बुद्धीने दिलेल्या निर्णयानुसार मन इंद्रियांकडून कार्य करवून घेते. महाभारतातील शांतिपर्वात एका श्लोकात मन व बुद्धीचे वर्णन करताना म्हटले आहे, व्यवसायात्मिका बुद्धि: मनो व्याकरणात्मक अर्थात, बुद्धी ही सारासार विचार करणारी (व्यवसायात्मक), तर मन हे विस्तार करणारे (व्याकरणात्मक) आहे.- अजिंक्य नावरे