ज्ञानाचे मुख्यत: तीन प्रकार पडतात. वृत्तीज्ञान, गुणज्ञान आणि सत्ताज्ञान .ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र वगैरे हे वृत्ती ज्ञानात येतात. कला आदी गुणज्ञानात येतात व ईश्वरी ज्ञानाला सत्ता ज्ञान म्हणतात. कंठोपनिषदामध्ये एक कथा आहे. नचिकेता आपल्या वडिलांसमोर येऊन त्यांना म्हणतो, मी या पृथ्वीवरची सर्व ज्ञान माहित करुन घेतली आहेत. त्यावर त्याचे वडील विचारतात,ज्या एका ज्ञानातून सर्व ज्ञान प्राप्त होतात. ते ज्ञान तुला प्राप्त झाले आहे काय? त्यालाच सत्ता ज्ञान असे म्हणतात. ज्याप्रमाणे सोन्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यामागे एक सोनेच आहे किंवा अनेक वस्त्रे आहेत. पंरतु त्यामध्ये एकच सूत आहे.नाना भिंती एकच माती,जगामध्ये एकच ब्रम्ह गड्या असेसर्वांमध्ये एकच जे तत्व आहे. ते सत्ता ज्ञान. आणि ते सत्ता ज्ञान संताच्या पायापाशी असते. ते प्रत्यक्ष ब्रम्ह असतात. म्हणजेच सत्य स्वरुप असतात.वेदामध्ये आपण प्रार्थना करतो ऋतंचमे, कृतंचमे, त्यात ऋतू हे सत्य आहे.ब्रम्हाने मायेची उपाधी धारण केली की, तो देव होतो.मायेपाशी शिव बोलती जेतीयाब्रम्हाने करुणेची उपाधी धारण केली की तो संत होतो.गणिताच्या भाषेत सांगायचे तरब्रम्ह -माया-ईश्वरब्रम्ह-करुणा-संतआता हे संत (सत्य) कळतात कुणालाएक गोष्ट सांगतो, एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव सुरुची व नावडतीचे नाव सुनीती. मला वाटते तुम्हाला ती गो्ष्ट आवडली. त्यात सुनितीच्या मुलाला म्हणजेच ध्रुवाला देव भेटला. जे सुरुचीचे आहेत. त्यांना सत्य कळत नाही. जे सुनीतीचे आहेत. त्यानांच सत्य कळते.- गोविंद सूत, दापोरा,ता. जळगाव.
नाना भिंती... एकच माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 2:52 PM