अशोकानंद महाराज कर्डिलेजो जो सजीव प्राणी आहे त्याची धडपड सुखासाठी असते. आणण सुखासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु सुख प्राप्त होत नाही. दुु:खाची कोणालाच अपेक्षा नाही. पण ते टाळता येत नाही. आपल्या अवतीभवती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल कीआपल्याला शांतताच नाही. ध्वनी प्रदूषण आहे. जीवमात्र क्रोधाच्या आहारी जाऊन भांडणे करीत असतांना दिसतो. रात्रं-दिवस नुसती धावपळ करीत असतांना दिसतात पण शांतता नाही. हॉर्नचा ध्वनी, लाऊड स्पिकरचा ध्वनी, मोटारींचा आवाज, सर्व प्रकारच्या आवाजाने डोके भणभणून जायला होते.अशांतस्य कुत: सुखं ।। गीता ।।असे वाटते कुठेतरी एकांतात जावे. जिथे कसलाही आवाज येणार नाही. शांत असे वातावरण हवे. पण असे वातावरण मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. तुकोबाराय एका अभंगात छान सांगतात.शांतीपरते नाही सुख । येर अवघेच दुु:ख ।।१।। म्हणवोनि शांती धरा । उतराल पैलतीरा ।।२।। खवळलीया काम क्रोधी । अंगी भरती आधी व्याधी ।।३।। तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ।।४।।जर अंत:करण शांत असेल तरच सुख मिळेल, अन्यथा नाही. हा सुंदर नियम महाराजांनी सांगितला आहे. यच्ययावत मानव जात आणि सजीव प्राणी विकारांच्या आहारी गेल्यामुळे अशांत झालेले आहेत. आपण जग सोडून तर जाऊ शकत नाही व जगाला बदलू शकत नाही. कारण..तुका म्हणे जन । केले गुणाचे तीन ।सत्व, राज आणि तम अशा तीन गुणांचे हे जग आहे. यात बदल होणार नाही. सर्व लोक एकाच गुणात आढळणार नाहीत.एक गोष्ट आहे. एक राजा होता. तो राजा फिरायला राजवाड्याबाहेर गेला. आणण त्याच्या असे लक्षात आले की त्याच्या पायाला माती लागली. (त्या वेळी पादत्राणांचा शोध लागलेला नव्हता.) त्याने प्रधानाला विचारले. माझ्या पायाला माती लागली. यावर काय उपाय करता येईल? प्रधान म्हणाला महाराज, आपण सांगाल ते करू! राजा म्हणाला प्रधानजी ! असे करा या सर्व पृथ्वीला जनावराच्या कातड्याने झाकून टाका. राजसत्ता आहे. म्हणाल ते करायची तयारी. नाही करावे तर पुन्हा राजाचा क्रोध. सर्वांना सहन करावा लागेल. सर्व पृथ्वी कातडयाने झाकता येईना. एक विद्वान मनुष्य राजाला भेटला आणि म्हणाला, महाराज ! सर्व पृथ्वीला कातडे पांघरूण घालण्याऐवजी जर आपल्या पायातच कातड्याचे जोडे करून घातले तर पायाला माती लागणार नाही. राजाला म्हणणे पटले. तात्पर्य तुम्ही सर्व जगाला सुधारण्याच्या प्रयत्नात कदाचित यशस्वी होणे कठीण आहे. पण तुम्ही स्वत:ला नक्कीच सुधारू शकता. तुम्ही सुधारला की तुमच्याकडे पाहून जग सुधारेल म्हणून सुधारणा ही आपल्यापासून सुरु करायची असते हेच खरे.शांती हा विषय मानसिक आहे. तुमच्या मनाने दुु:ख मानून घेतले आहे. जर तुम्ही हे माझे नाही म्हटले की दुु:ख तुम्हाला होत नाही. दुु:ख माझे पणात आहे. मी,आणण, माझे हे ज्याचे गेले तोच साधू असतो . बाकी सगळे वेषधारी असतात. जगाने तुम्हाला दुखी करायचे ठरवले आणि तुम्ही जर मनावर घेतले नाही तर तुम्ही दु:खी होऊ शकत नाही . ज्याच्या जवळ क्षमा रुपी शस्त्र आहे, त्याला दुर्जन काही करीत नाही. कारण हा प्रतिकारच करीत नाही. उलट अपकार करणाऱ्याला क्षमाच करतो.असे दिसल्यानंतर तो दुर्जन असूनही आघात करीत नाही. तो सुद्धा शांत होतो. तुमची शांत वृत्ती पाहून समोरचा सुद्धा शांत होतो, हा अनुभव आहे.एक महत्वाचे निदान तुकाराम महाराजांनी केले आहे. तुमचे काम , क्रोध जर खवळले तर मात्र तुम्हाला आधी आणि व्याधी होऊ शकते. आधी म्हणजे मानसिक विकार आणि व्याधी म्हणजे शारीरिक विकार. काम विकार जर खवळला तर अंत:करण चंचल होते. आणि इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी तो प्रवृत्त होतो. पण जर ती वस्तू प्राप्त झाली नाही, काम पूर्ती झाली नाही, मात्र क्रोध येतो. आणण क्रोध आला की तो काय नुकसान करील हे सांगता येत नाही. मग तो अगदी सर्वनाश करून घेतो, अशी उदाहरणे आपण जगात अनेक ठिकाणी पाहतो.ध्यायतो विषयां पुंस:संगस्तेषूपजायते। संगात्संजायते काम:कामात्क्रोधो अणभजायते ।। क्रोधाद्भवणत सम्मोह: संमोहात्स्मृणतणवभ्रम:। स्मृणत भ्रन्शात्बुस्पद्धनाशो बुस्पद्धनाशात्प्रणश्यणत ।। गीता अ . २-६२-६३।।भागवत पुराणामध्ये सौभरीं नावाच्या एका ऋषींची कथा येत. हा ऋषी जलयोगी होता. पाण्यात तासन्तास उभा राहायचा व जप करायचा. एकदा त्याचे सहज पाण्यातील माशाकडे लक्ष गेले व त्या माशांचे मैथुन त्याने बघितले आणि त्याच्या मनामध्ये काम विकाराने प्रवेश केला. त्याच्या तपश्चयेवरुन लक्ष उडाले आणि वासनेने त्याचे अंत:करण व्यापले. पण संस्कारी होता म्हणून तत्कालीन राजाकडे गेला. त्या राजाला पन्नास मुली होत्या. त्यापैकी एकीशी लग्नाची इच्छा त्याने व्यक्त केली. राजाने त्याचे वय, रूप बघून मुलगी द्यायची नाही असे ठरविले. पण नाही म्हणता येईना. त्याने ऋषीला सांगितले. महाराज ! आम्ही क्षत्रिय आहोत. जो कोणी आम्हाला १०० शामकर्ण घोडे आणून देईल त्याला आम्ही कन्यादान करतो. राजाचा डाव सौभरींच्या लक्षात आला. त्याने सर्व तपश्चर्या पणाला लावली. आणि १०० शामकर्ण घोडे मिळविले आणि राजाला दिले. तपश्चर्याच्या बळाने त्याने सौंदर्य आणि सुदृढ शरीर प्राप्त केले. काय आश्चर्य त्या सर्व पन्नास मुलींनी सौभरींबरोबरच विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. तात्पर्य त्या पन्नास मुलींबरोबर त्याचा विवाह झाला. पण ! एका कामवासनेने त्याचे सर्व तप व पुण्य गेले आणि त्यागी ऋषी मात्र भोगी झाला. नियम असा आहे की जो भोगी असतो तो रोगी होतोच. असा मनुष्य कसा शांती प्राप्त करू शकेल? तो सतत दुु:खीच राहणार. म्हणून त्यागेन एके अमृतत्वात ।। असे उपणनषद म्हणते. त्यागानेच मनुष्य अमृतत्व प्राप्त करू शकतो. म्हणजेच दुु:खाचा अभाव व अशा व्यक्तीला त्रिविध ताप त्रास देत नाहीत.लेखक भागवताचार्य असून अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी(पाटील) येथ गुरुकुल भगवंताश्रम ते चालवितात.