पर्युषण पर्वाच्या वार्षिक अकरा कर्तव्याचे जे पालन करतात ते पुण्यशाली ठरतात. ही कर्तव्ये अशी, १) संघपूजा २) साधमिक भक्ती ३) यात्रात्रिक ४) जिनघर स्नात्रपूजा, ५) जिनद्रव्य वृद्धी ६) महापूजा ७) रात्रीजागरण ८) श्रुतपूजा ९)उद्यापन १०) तीर्थप्रभावन ११) शुद्धी. वरील कर्तव्यं श्रावकाने वर्षात किमान एकदा तरी करायला हवेत, असे शास्त्रकार सांगतात.
संघ म्हणजे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका. हे सर्व परमेश्वराची आज्ञा धारण करतात. त्यांना संघ म्हणतात. शास्त्रकार सांगतात, पंचमहावृतधारी साधू, साध्वी, भगवंताचे संयम निर्वाहासाठी आहार, पाणी, वस्तू, पात्र, पुस्तक आदी दान देणे. तसेच त्यांच्या शारीरिक चिकित्सेत औषध, गोळ्या, डॉक्टर यांची सुविधा करणे. त्यामुळे श्रावक वर्ग जैन शासन प्राप्ती गौरवाची आहे. यात्रात्रिक म्हणजे प्रत्येक वर्षी अठ्ठाई पर्वामध्ये गाव - शहरातील देवांच्या मंदिरांत जाऊन भक्ती, पूजा, अर्चना, अभिषेक करणे. देवांचे गुणगाण करणे. त्यामुळे गावावर येणारे संकट दूर होते, असे शास्त्रकार सांगतात.
तीर्थयात्रेलाही अत्यंत महत्त्व आहे. जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळं पालीताना, गिरनार आणि तीर्थंकर भगवानांची जन्मभूमी, दीक्षाभूमी अशा पंचकल्याणक भूमीचे दर्शन करून शुभम आणल्यानंतर अनेक पापकर्म नष्ट होतात. सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा करावी. पच्चदान करण्याचे पण जीवनात किती महत्त्व आहे. मुनी भगवंत प्रवचनाव्दारे सांगतात, हे प्रवचन भावपूर्ण ऐकून ते आत्मसात करणे हे जैन धर्मीयांचे कर्तव्य आहे. छोट्या तपाचे महत्त्व आहे.
नवकाराशी म्हणजे सूर्योदयानंतर नवकार स्मरण करून पाणी तोंडात घ्यावे. त्यामुळे शंभर वर्षापर्यंत नरक कर्म बंध होतात.पर्युषण पर्वाचे पाचवे विशेष कर्तव्य म्हणजे ‘चैत्यपरिपाठी’. चैत्य म्हणजे मंदिर म्हणजे शक्य झाले तर देवळातल्या देवाची पूजा करून शासन शोभा वाढविणे. अशा प्रकारे या आठ पाक्षिक दिवसात हे पाच कर्तव्यासोबत साधर्मिक श्रावकांनी आणि श्रावकांनी पुण्याच्या उदयाने जैन धर्माची विवृद्धी करून अष्ठान्हिका पर्वाव्दारे जिनशासनाची शोभा वाढवून उन्नती करणे!- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड