शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

Pitru Paksha 2019 : भरणी श्राद्ध करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचे पुण्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 9:08 AM

Pitru Paksha 2019 : भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते.

भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. मृताच्या पहिल्या वर्षाच्या आत येणाºया भाद्रपदातील भरणी नक्षत्रावर मृतादि तिघांना धरून श्राद्ध करावे. पितृपक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरे होईल, असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध न केले तर तो मृतात्मा प्रेतत्वापासून कसा मुक्त होईल, असे शास्त्रकारांचे म्हणणे असल्याचे वेदशास्त्र संपन्न मंगेशगुरुजी ठोसर यांनी सांगितले.

ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात, अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, ब्रह्मकपाल इत्यादि तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते. तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादि तीर्थांवर श्राद्धे करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणी श्राद्ध करतात. दरवर्षी भरणी श्राद्ध करावे, असे शास्त्रकार सांगतात. वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणी श्राद्ध होतच होते. परंतु कालौघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशीच श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणी श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे. भरणी श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितलेला आहे. तो प्रथम वर्षानंतर दुसºया वर्षापासून दरवर्षी भरणी श्राद्धासंबंधी समजावा, असे शास्त्रकार सांगतात. भरणी श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे की दुसºया वर्षीपासून करावे, याबाबत देशभरातील विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. अनेक ठिकाणी तर दरवर्षी भरणी श्राद्ध अवश्य करावे, परंतु पहिल्या वर्षी बिलकूलच करू नये, असे सांगितले जाते. तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे, असे म्हटले जाते. त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये, याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा, असे सांगून ठेवलेले आहे.काहींच्या मते तर भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघा नक्षत्रादि श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसºया वर्षीपासून करावीत, असे म्हणतात. नित्य तर्पणातदेखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये, असे म्हटले जाते.

श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा?

श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा, याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेले आहे. श्राद्धमंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे. शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वत: हा स्वयंपाक करावा. ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा. तेही शक्य नसेल तर भावकीने, सजातीय, सदाचारी, स्रेही, मित्र, मातृ-पितृ वंशज यांनी करावा. तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती, पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा, असे शास्त्राने सांगितलेले आहे.

ब्राह्मणांचे आसन कशाचे असावे?

श्राद्धातील बारीक-सारीक बाबींचेही शास्त्राने विवेचन केलेले आहे. देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाºया ब्राह्मणांचे आसन कसे असावे, याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे आसन रेशम, लोकर, लाकूड, कुशाचे असावे, असे म्हटले आहे. मात्र, हे आसन लोखंडाचे कदापिही नसावे, असे सांगितलेले आहे.

- संकलन : सुमंत अयाचित

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAdhyatmikआध्यात्मिक