- शैलजा शेवडेराम..़ म्हणजे चराचरात असलेले ब्रह्मतत्त्व ....! रमन्ते योगिन: अस्मिन सा रामं उच्यते योगी ज्या शून्यात रमतात, त्याला राम म्हणतात..राम आनंद आहे, आनंद कंद आहे... आनंद द्यायला निर्गुण निराकाराने घेतलेले एक सुंदर रूप , म्हणजे राम...! मधुमास आला आहे.. अयोध्येत होलिकोत्सव चालू आहे.. त्याचे वर्णनही अत्यंत आनंददायी...!वसंतातली धुंद हवा ती, तरुवर डोलती, पक्षी गाती,आम्रतरूवर मोहर सुंदर, पलाशपुष्पे रंग उधळतीमोहक, कुसुमे, गंधित केशर, कुंकुमाने तबके सजती,अवधनगरी, हर्षित, हर्षित, शरयुतीरी सारी जमतीकोणा हाती असे झांज तर , कोणा हाती असे खंजिरा,कोणी उधळी गुलाल आणि, कोणी उधळत असे अबीरकोणी वाजवी मृदुंग सुंदर, कोणी डफ करताल मनोहर,कोणी गात से, होळीगीत ते,शब्द, सूर, लय, मधुर खरोखरमुग्ध किशोरी, जनककुमारी,लाज विलक्षण मुखकमलावरी,पाहे रघुवीर शरयुतटावरी,हाती त्यांच्या कनक पिचकारीधडधड धडधड होई अंतरी, बघून सावळी मूर्त साजिरी,समीप येती रघुपती राघव,खट्याळ भाव ते श्रीवदनावरीराम फेकती, रंग सीतेवरी, चिंब चिंब ती होई बावरी,लज्जा सारून, गुलाल टाकी,मधुमासाची किमया न्यारीहोळी आली, होळी आली, गाई लक्ष्मण रामसंगती,भरत घेई, ढोलक हाती, सुगंधी केशर शत्रुघ्नामुठीवैदेहीसह सर्व सख्याही, रंगाची ती करती उधळण,दृश्य अलौकिक बघावया ते, जमती सारे ऋषी,देवगण रघुपती होळी खेळतसे हो,रघुपती होळी खेळतसे,निराकार ते ब्रह्मची केवळ, रंगरंगीले होत असे.
रघुपती होळी खेळतसे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:23 AM