शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 9:37 PM

"व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कौशल्य असते...

- डॉ.दत्ता कोहिनकरएकमेकांना समजून घेणारा, एकमेकांवर प्रेम करणारा, एकमेकांना पडत्या काळात साथ देणारा, एकमेकांचे हित चितणारा, एकमेकांची प्रगती करणारा, एकमेकांचा आदर करणारा असा संघ नेहमी पुढे जातो.ह्यह्य म्हणून संघभावना टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली देणे आवश्‍यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की सुशिक्षित लोकांना एकत्र आणणे म्हणजे बेडकांचे तराजूत वजन करण्यासारखे आहे. एक तराजूत टाकताना दुसरा झटकन उडी मारून बाहेर पडतो म्हणून संघ तयार करून सर्वांनी एकविचारांनी एकत्र राहणे आवश्‍यक असते. यासाठी नेता हादेखील निःस्वार्थ व लोकप्रिय असावा लागतो. नेपोलियनचे सैनिक त्याने दिलेला आदेश तंतोतंत पाळायचे. त्यावर कोणीही प्रतिप्रश्‍न करीत नसत किंवा शंका घेत नसत. नेपोलियनचे यश यातच दडलेले होते. एकता व आज्ञाधारकता एकत्र आली आणि संघभावना वाढीस लागली, की यशाची दारे उघडणे सोपे जाते. जोपर्यंत आपण संघटित आहोत, तोपर्यंत आपली किंमत उच्चतम असते. ज्या क्षणी आपण संघातून विलग होऊन एकटे होतो, तेव्हा आपली किंमत खूप खाली येते* म्हणून कुटुंबात - नातेवाइकांत, संघात राहण्यासाठी आपली धडपड चालू असते. एकटा माणूस फार मोठे काम करू शकत नाही. त्यासाठी संघाचीच गरज असते.  पानिपतच्या युद्धात अहमदशाह अब्दाली रणनीतीची आखणी करत असताना नदीच्या पलीकडच्या काठावरील मराठ्यांच्या छावणीची पाहणी करत होता. त्या वेळी मराठ्यांच्या छावणीत जागोजागी चुली पेटलेल्या त्याला दिसल्या. मराठ्यांचे सैन्य नेमके किती याची विचारणा त्याने गुप्तहेराकडे केली, तेव्हा त्याने सांगितले, ""मराठ्यांचं सैन्य फारसं नाही. तेथील प्रत्येक सैनिकाने आपल्या स्वयंपाकासाठी स्वतंत्र चूल पेटवली आहे.ह्यह्य त्यावर चुटकी वाजवून अब्दाली म्हणाला, ""आपण शंभर टक्के युद्ध जिंकणार. कारण जे सैनिक अन्न शिजवतानाही एकत्र येत नाहीत, ते राष्ट्रासाठी एकदिलाने कसे लढतील? पानिपतचा, इतिहास आपणास माहीतच आहे म्हणून संघाने एकत्र येणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. संघात लोक वेगवेगळ्या विचारांचे असतात. म्हणतात ना, "व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती, त्यांना एकत्र बांधून ठेवणे हे नेत्याचे कौशल्य असते.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक