- रमेश सप्रेगोष्ट तशी अनेकांना माहीत आहे. एका गावातली एक स्त्री. पती गेल्यानंतर पूर्णपणे निराधार. तशी दिसायला नाकीडोळी नीटस. कोणाचंही लक्ष वेधून घेणारी. पण स्वभावानं अत्यंत सात्विक. देवाच्या उपासनेची, सत्संगाची आवड असलेली. चार घरात भांडी, कपडे-धुणं-पाणी भरणं अशी लहान सहान कामं करून उदरनिर्वाह करत होती. अशा स्त्रीकडे काही पुरुषांची वासनेनं वखखलेली नजर गेली नसती तरच नवल. तिच्याकडे भोगदासी म्हणूनच पाहिलं जायचं. पण ती या सर्वाचा ठाम विरोध करायची. तिच्यासाठी तिचं शील हीच सर्वात मोलाची पवित्र गोष्ट होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांनी तिच्याविरुद्ध नको नको त्या गोष्टी बोलणं सुरू केलं. ती कुलटा आहे. चारित्र्यहिन आहे. सर्वात म्हणजे डायन आहे. चेटकीण आहे. लहान मुलांना तिच्यापासून धोका आहे असं काहीबाही सांगून सुद्धा ती खंबीरच राहिली. कुणालाही तिनं दाद दिली नाही.अखेर गावची पंचायत बसली. तिला काही न विचारताच फक्त काही दुष्ट लोकांचं ऐकून तिला शिक्षा दिली गेली.काहींच्या मते ती निदरेषच होती. तर काहींनी तिला गावातून हद्दपार करण्याची शिक्षा सुचवली; पण दुष्ट लोकांचं यानं समाधान होणारं नव्हतं. त्यांनी सुचवलं की या दुष्ट स्त्रीला डायनला एका झाडाला बांधू या आणि गावातल्या प्रत्येकानं तिच्यावर दगडाचा वर्षाव करून ठेचून मारूया. या दुष्टांचा पंचायतीत तसंच गावातल्या लोकांत मोठा दबदबा होता.झालं. ठरलेल्या दिवशी तिला मैदानावरील एका झाडाला बांधलं गेलं. ह्यमी निर्दोष आहे कोणताही अपराध माझ्याकडून झालेला नाही. मी पापी नाहीयेह्ण पण तिचे हे शब्द कुणाच्याही कानावर पडत नव्हते. शेकडो माणसांचा गोंगाट मात्र ऐकू येत होता.कसा कुणास ठाऊक पण त्याचवेळी एक सत्पुरुष त्या ठिकाणी पोचला. त्याचा चेहरा खूपच तेजस्वी होता. लांब, पांढरी दाढी छातीपर्यंत पोचली होती. डोक्याला केशरी रंगाचा फेटा बांधला होता. त्याला पाहताच सारेजण एकदम शांत झाले. आकाशातून उतरलेल्या एखाद्या देवदूतासारखा तो दिसत होता. आपल्या धीरगंभीर आवाजात तो बोलू लागल्यावर लोकांना आकाशवाणी होत असल्यासारखं वाटलं. ह्यहा सारा काय प्रकार आहे?ह्ण या त्याच्या प्रश्नावर गावच्या प्रमुखानं सांगितलं ह्यही कुलटा आहे. पापी आहे. हिला आम्ही दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा दिलीयह्ण यावर तो सत्पुरूष उद्गारला. ह्यफारच छान मीही एक दगड तिच्यावर फेकून मारतो; पण त्यापूर्वी एका गोष्टीचा विचार करायला हवा.ह्ण पहिला दगड कुणी मारायचा? दुसरं कुणी काही म्हणणार एवढय़ात तो सत्पुरूष पुढे म्हणाला, ह्यअर्थातच ज्यानं आजवर एकही पाप केलेलं नाही त्यानं पहिला दगड मारायचा.ह्ण हे ऐकून सारे विचारात पडले. एकमेकांकडे पाहू लागले. जो तो आपल्या मनात आपण आतापर्यंत केलेल्या पापांचा पाढा वाचू लागला. सारे शांत झालेले पाहून तो सत्पुरूष उद्गारला, ह्यअरे, आपण सारे जर पापी आहोत तर दुस-याला पापी ठरवून शिक्षा करण्यात कार्य अर्थ आहे? मी स्वत: सुद्धा काही पापं केलेली आहेत.ह्ण असं म्हणून त्यानं हातात उचलून घेतलेला दगड फेकून दिला. प्रत्येकाच्या हातातला दगड आपोआप गळून पडला. त्या सत्पुरूषानं त्या बाईला सोडवलं नि त्या जमावातल्या स्त्रियांना उद्देशून तो शांतपणो म्हणाला, ह्यतुम्ही या दुर्दैवी स्त्रियासारख्या स्त्रियाच आहात ना? तुम्हाला हिची वेदना, व्यथा कळली नाही. तुम्ही सुद्धा हिला दगडांनी ठेचायला तयार झालात? तुम्ही मनात आणलं असतं तर एक संरक्षक कवच बनून हिचं रक्षण केलं असतं.ह्णसर्वावरून आपली प्रेमळ दृष्टी फिरवत तो सत्पुरूष उद्गारला अरे, आपण सारे स्वत: काचेच्या घरात राहात असूनही इतरांच्या घरांवर दगड मारतो. यात त्यांचा घात तर आहेच; पण आपलाही घात आहे. यामुळेच तर एवढय़ा समस्या, एवढी दु:खं, एवढय़ा व्याधी आपल्या जीवनात आहेत. आपण आत्मनिरीक्षण करत राहू या. आपल्या कृती, त्यांच्या मागचे हेतू, त्यांचे घडणारे परिणाम इकडे ध्यानपूर्वक लक्ष देऊया. आपण आत्मपरीक्षणही करू या. आपल्या चुका, आपली पापं, आपले अपराध यावर सतत विचार करत राहू या. असं आपल्याकडे पाहत साक्षीभावानं आपण जगायला शिकलो तरच अखंड आनंदात राहू शकू. तुम्ही आनंदात राहण्याचा प्रयत्न करा. मी तुम्ही आनंदात राहावं म्हणून प्रार्थना करीन!लोकांना काही कळण्यापूर्वी तो तेजस्वी सत्पुरूष जसा आला तसा निघूनही गेला; पण मागे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ठेवून गेला.
आत्मनिरीक्षणाबरोबर आत्मपरीक्षण करणं गरजेचं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 7:24 AM