भावना या दोन प्रकारच्या असतात.त्यात देहभावना व आत्मभावना या दोन भावना असून, त्यात देहभावना या लौकिक बाबींची पुर्तता करतात. तर आत्मभावना हे पारलौकिक बाबींची पूर्तता करतात. तथापी संत संप्रदायात आत्मभावना श्रेष्ठ असून भगवंतांच्या कृपेसाठी ही आत्मभावना अत्यंत आवश्यक आहे.जीवनाच्या परिपूर्णतेचा देहभावना बदलण्याची अत्यंत गरज असून जो पर्यंत आपण आपली देहभावना बदलत नाही,तो पर्यंत आपणास आत्मलाभ मिळणार नाही. देहभावना ही मनाच्या चंचलतेनुसार बदलत राहते.मात्र,आत्मभावना ही बदलत नाही. जगामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहे हे प्रत्येकाला वाटते. हा संसाराचा नियमच आहे.मात्र,हा सर्व प्रारब्धाचा भाग आहे. जीवनात प्रारब्ध ही फार मोठी बाब असून, धन,सत्ता,अन्न व चांगल्या कुळात जन्म या बाबी प्रारब्धाने प्राप्त होतात. तथापि बिकट प्रारब्धावर संत हा उत्तम इलाज आहे. संतापेक्षा जगात कोणीच मोठा नाही.संत हे जीवन पथप्रदर्शक असून संतांच्या सान्निध्यामुळे व त्यांच्या सत्संगामुळे जीवन हे अत्यंत पवित्र होते. संतांनी स्वत:च्या जीवनात साधना केली. प्रपंचात मन रममाण असले तरी संसार हा परिपूर्ण नाही. संसार सर्वांगीण मोठेपणा मिळवून देत नाही. प्रपंचामध्ये किती शून्य एकत्र केले तरी बेरीज होत नाही. उलट वजाबाकीच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगून संसारात राहून परमार्थ साधता येते.
- हभप एकनाथ महाराज चतर