श्री. रामकृष्णांचे भक्त श्री. गिरीश म्हणत, श्रीरामकृष्णांचे नाव घेऊन मी रोग बरा करेन. श्रीरामकृष्ण भक्तांना म्हणाले, जे हीन बुद्धीचे असतात तेच सिद्धाईची इच्छा धरतात. रोग बरा करणे, मुकद्दमा जिंकणे, पाण्यावरून चालत जाणे आदी. ईश्वराचे खरे भक्त ईश्वराचे पादपद्म सोडून काहीही इच्छित नसतात. ह्यद्ये (हृदय) एक दिवस म्हणाला, मामा, आईजवळ काही शक्ती मागा. काही सिद्धायी मागा. माझा बालकाचा स्वभाव. काली मंदिरात जप करण्याचे वेळी आईला म्हणालो, 'आई, ह्रदे काही शक्ती मागायला, काही सिद्धायी मागायला सांगतो आहे. आईने लगेच दाखवून दिले. एक म्हातारी वेश्या समोर येऊन माझ्याकडे पाठ करून उकड बसली. भल्या मोठ्या फेंडा काळ्या किनारीच लुगडं नेसलेली. विष्ठा टाकते आहे. ! आईने दाखवून दिले की सिद्धायी म्हणजे या थेरड्या वेश्येची विष्ठा होय ! तेव्हा जाऊन हृदयाची खरडपट्टी काढली. तू का बरं मला असली गोष्ट शिकवून दिलीस ! तुझ्यामुळे तर मला हे असले बघावे लागले. !' (संदर्भ -श्रीरामकृष्ण वचनामृत-२, पान १००५)ज्यांना थोडीशी सिद्धी प्राप्त असते ते लोक चमत्कार वगैरे करतात आणि अशा लोकांकडे खूप गर्दी जमते. मग हे लोक अंगारा, धुपारा करून भस्म, ताईत असे काहीबाही देतात व लोकांचे रोग बरे होतात. करीती अंगारे धुपारे । तरी का मरती तयांची पोरे ।।तु ।। तुका म्हणे भोग सरे। गुणा येती अंगारे ।। प्रारब्धातील भोग सांपत येतो आणि या बाबाचा अंगारा मिळतो व रोग बरा होतो. रोगी म्हणतो महाराजांची कृपा झाली आणि मी बरा झालो. अशाच लोकांकडे गर्दी दिसते. मग हे लोक गुरु असल्याचे सांगतात. मग शिष्य-सेवक मिळवितात आणि त्यांचा पोकळ प्रचार करणारे मिळतात. यांचे ऐश्वर्य वाढत जाते आणि प्रारब्ध भोगून सरायचे असते. पण यांना खरा परमार्थ माहिती नसतो. काही महाराज पाण्यावर चालण्याचे नाटक दाखवितात. लोकांना तो देवाचा अवतार आहे, असे वाटते.एक छान गोष्ट माझ्या वाचण्यात आली आहे. एका गावात दोन भाऊ असतात. एक तपश्चर्या करणारा असतो आणि थोरला भाऊ गृहस्थ असतो. तो आपली शेती करून, कष्ट करून गृहस्थ धर्माचे पालन करून सुखी जीवन जगत असतो. धाकटा मात्र तपश्चर्या करण्यात मग्न असतो. तो जंगलात जाऊन बारा वर्षे घोर तपश्चर्या करतो आणि त्याचे फळ म्हणून त्याला एक जलतरण नावाची सिद्धी प्राप्त होते. तो जसा जमिनीवर चालतो तसा तो पाण्यावर चालू शकतो. लोकांना याचे खूप नवल वाटते. दुसऱ्या दिवशी याच्या जलतरण सिद्धीचा प्रयोग करण्याचे ठरले. सर्व लोक दुसºया दिवशी नदीच्या किनारी जमले. त्यात याचा थोरला भाऊ पण होता. भाविकांनी या सिद्धयोग्याला हार घालून त्याची पूजा करून सन्मानीत केले. तो लगेच जमिनीवर चालतात तसे नदीच्या पाण्यावर चालू लागला. त्याचे ते चालणे बघून लोकांनी त्याचा जयजयकार केला. लोक अचंबित झाले. थोरला भाऊ तेथेच होता. त्याने त्या नदीमधील एका होडीवाल्याला बोलविले आणि म्हणाला, मला परीकडल्या तिरावर लवकर जायचे आहे. किती पैसे घेशील? त्याने सांगितले, जास्त काही नाही. फक्त दोन रुपये द्या. लगेच सोडवितो. हा त्या होडीमध्ये बसला आणि त्या धाकट्या भावाच्या अगोदर पलीकडच्या तीरावर गेला. जेव्हा तो योगी भाऊ पलीकडच्या तीरावर आला तेव्हा हा मोठा भाऊ त्याला म्हणाला, तू बारा वर्षे तप करून काय मिळविले? फक्त एक क्षुद्र सिद्धी जिची किंमत दोन रुपये सुद्धा नाही. विचार कर तुझ्या अगोदर मी दोन रुपयात नदीच्या पैल तीराला आलो. अरे, बारा वर्षे फक्त भगवंतांचे स्मरण केले असते तर तुला मोक्ष मिळाला असता. मी प्रपंचात राहून जमेल तसे भगवंताचे चिंतन करतो व कष्ट करून गृहस्थ धर्म निभावतो. तू काय केले. एक क्षुद्र सिद्धी मिळवून काय मिळविले? ताप्तर्य असे की, सिद्धीचा उपयोग करणाºयाला साधू म्हणत नाहीत. त्याला खरे ब्रह्मज्ञान नसतो. तो फक्त चमत्कार करून लोकांना भुलवत असतो. ज्यांना खरे कळत नाही, असे लोक अशांच्या जाळ््यात फसतात.पैठण निवासी संंत श्री. एकनाथ महाराजांनी त्यांच्या काळातील अशा भोंदू साधूंचे पितळ उघडे पाडले होते. त्यांनी भागवत एकादश स्कंधावर भाष्य लिहले. भारूड, अभंग,गौळणी, चतु:श्लोकी भागवत, भावार्थ रामायण, असे अनेक ग्रंथ लिहून समाजात जागृती केली. अंधश्रद्धेवर आघात केले. ते एका अभंगात म्हणतात,ओळखिला हरी धन्य तो संंसारी । मोक्ष त्याचे घरी सिध्दीसहीत ॥१॥सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥काय तें करावें संदेही निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३॥केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥एका जनार्दनी नाही यातायाती । सुखाची विश्राांती हरिसंगे॥५॥ज्याने हरीला खरे ओळखले, तोच धन्य होय. त्याचे घरी मोक्ष सिद्धीसहीत असतो. पण तो त्या सिद्धीचा वापर करीत नाही. कारण त्याला माहित असते की सिद्धी हे पुण्य आहे तोपर्यंतच असते. पुण्य संंपले की सिद्धी त्याला सोडून जात.े म्हणून नाथ बाबा म्हणतात सिद्धीचे ज्याला पिसे म्हणजे वेड लागले आहे त्याला कोण पुसतो ? राजहंस कधी दूध आणि पाणी एकत्र करून दिले तर तो कधीही पाणी पीत नाही. तो दूधच पितो. तसे खरा भक्त अशा सिद्धीच्या मागे लागत नाही, आणि खरे तर इतरांनीही अशा चमत्कार करणाºया साधूच्या मागे लागू नये. संशयाचे ज्ञान काय कामाचे ? खरे ज्ञान महत्वाचे आहे. नुसते निर्गुणाला काय करावे. ज्ञानाने सगुण व निगुर्णाचा समन्वय साधला गेला त्यामुळे त्याला आता यातायात म्हणजे मरण रागहले नाही. त्यासाठी स्वस्वरूपाचे ज्ञान महत्वाचे आहे. ‘‘ज्ञानादेव तू कैवल्यम’’ असे श्रुती माउली सुद्धा सांगते.तात्पर्य अशा चमत्कार करण्या-या भोंदू साधूपासून सावध राहावे. चमत्कार कधीही खरे नसतात, त्यातही योगिक विज्ञान असते ते वेगळे हेही या प्रसंगी लक्षात असावे.-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागवत आश्रम , चिचोंडी, ता. नगरमो. ९४२२२२०६०३