आज आपणास जगात काय दिसते आहे? समाधान नष्ट झालय. माणूस हा सर्वार्थाने आर्थिक स्पर्धेत ओढल्या गेला आहे. जे जे जगात आहे ते ते मला मिळाले पाहिजे ह्यासाठी लागणारा पैसा मिळवणे प्राप्त म्हणून ते मिळविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे असाच प्रकार सर्वत्र चालत आला आहे. हव्यास, लोभ सुखलोलुपतेचा थयथयाट होत आहे. मानसिक क्रूरता वाढली आणि सदाचार, सद्गुणांची सातत्याने गळचेपी होत आहे. सामाजिक बैठक आपण अर्थप्रधान केली आहे. ह्या जगाचा पालनकर्ता कोणीतरी आहे आणि आपण केलेल्या कर्माचा जाब आपणास त्याचे जवळ द्यायचा आहे हे त्रिवार सत्य आम्ही विसरत आहो. पैशासाठी जग वेडे होवून गेल्याने आलिक समाधान न मिळता, जीवनात अनेक समस्या आम्ही निर्माण केल्या आहेत.संतजनाच्या मानदियाळीने आम्हाला वेळोवेळी जाणीव करुन दिली आहे. संत म्हणतात- ‘अजुनी तरी होई जागा। तुका म्हणे पुढे दगा। आपल्या संकटकाळी देवाने धावावे असे वाटत असेल तर, त्याला आपण अगोदर ऋणी करुन ठेवले पाहिजे. ह्या आजच्या वास्तव परिस्थितीतून कल्याण होण्यासाठी आपण तप केले पाहिजे. तपाने पत वाढते. तपाने देवर्षी होता येते. सर्व पापाचे भस्म होवून जाते. नामसंकिर्तनासारखे दुसरे प्रभावी साधन ह्या कलियुगात नाही. प्रभु नामसंकिर्तन हे कर्मात्मक साधन नसून ते भावात्मक साधन आहे.भाव तोची देव, भाव तोची देव ।ये अर्थी संदेह धरु नका।आपली सर्व कर्मे शुद्ध असावी. मन ज्ञानप्रकाशाने उजळून निघावे अशी अंतर्बाह्य शुद्धता जीवनात यायला हवी. जगाचा सुसूत्र कारभार ज्याच्यामुळे बिनचूक चालला आहे त्या जगतचालकाची भावयुक्त भक्ती नसेल तर माणूस हा पतीत होईल.अर्जुना मोझे ठायी। आपणे विण सौरसु नाही।मी उपचारे कवणाही। नाकळेगा।देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. एक विचारवंत म्हणतात-God is Concerned with not what you give,but with how you giveदेवाला तुम्ही काय देता याला महत्व नसून, कोणत्या भावनेने देता याला महत्व आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञान-कर्माने साधत नाही. भक्तीमध्ये अर्पण करण्याची भावना असते आणि त्या भावनेतच खरी शक्ती असते. ळङ्म३ं’ २४१ील्लीि१ संपूर्ण शरणागती ही जीवन तरुन जाण्याची गुरुकिल्ली आहे ह्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.यशोदा माता दोरी घेवून कृष्णाला बांधण्यास धावली. त्याप्रमाणे कर्माची दोरी घेवून आपण परमेश्वरास बांधण्यास धावलो तर तो आपल्या हातात सापडणार नाही. आपण त्याला ज्ञानाच्या उखळीला बांधले तर तो ती उखळीच घेवून जाईल. मोठेमोठे वृक्षसुद्धा उन्मळून पडतील. यशोदेने ज्याप्रमाणे भक्तीमुक्त भावनेने गोपालकृष्णाचा धावा केला आणि तो श्यामसुंदर तिच्या हातात सापडला तोच भाव, तीच शरणागत वृत्ती जीवनात असावी म्हणजे प्रभुची मंगलमय कृपा आपल्यावर होईल. हरिपाठात माउलींनी अशाच दोन भक्तांचा संदर्भ दिला आहे. ‘सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला। उद्धवा लाधला कृष्णदाता।।फलाची अपेक्षा न करता कर्तव्य कर्म करावे. केलेले कर्म देवाला अर्पण करावे हाच कर्मयोग स्पष्ट करुन, भगवंत गीतेचे स्पष्ट करतात की, अहंकार गळून पडणे, फलाची आसक्ती नसणे आणि देवाला शरण जाणे ही कर्मे म्हणजेच ईश्वराची आराधना आहे. म्हणून आपणही संतसंदेह लक्ष्यात असू द्यावा- ‘भाव धरारे। आपुलासा देव करारे।।- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे
Spiritual : भाव हा भक्तीचा प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:20 PM