- माता अमृतानंदमयी
मुलांनो, आजच्या कौटुंबिक जीवनात पुरुष म्हणतील, की दोन अधिक दोन चार होतात. मात्र, स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर दोन अधिक दोन चार नाही तर कितीही होऊ शकतात. बहुतेक वेळेस पुरुष बुद्धिमान आणि स्त्रिया भावनिक असतात. हे वाचल्यानंतर स्त्रियांनी वाईट वाटून घेऊ नये. पुरुषांमध्ये स्त्रीत्व असतं आणि स्त्रियांनाही पुरुषी बाजू असते. सर्वसाधारणपणे पुरुष खंबीर निर्णय घेतात, जे परिस्थितीच्या अधीन होऊन घेतलेले नसतात. जर आपल्याला पुरुषाचा मूलभूत स्वभाव माहीत असेल, तर एखाद्या परिस्थितीत पुरुष कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील याचा अंदाज लावता येतो. स्त्री यापेक्षा वेगळी असते. ती परिस्थितीच्या अधीन होते आणि हा तिच्या स्वभावातील कमकुवत मुद्दा आहे. तिचे अंत:करण दयाळू असते. हृदय पाघळण्याचा स्वभावच तिच्या त्रासाचे प्रमुख कारण आहे. याचमुळे एखादी स्त्री एखाद्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया देईल हे सांगणे अतिशय कठीण असते. आयुष्याचा प्रवास बुद्धिमत्ता आणि हृदयाने केला जातो आणि ते विरुद्ध दिशांसारखे आहेत. म्हणूनच कित्येकदा कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंदाचा अभाव दिसून येतो. अध्यात्म हे तुलनात्मक आहे व ते एकत्र आणत अनुरूप नसलेले हृदय आणि बुद्धिमत्ता यांच्यात मिलाफ घडवून आणतेच. अध्यात्म हे या दोन्ही गोष्टींना एकत्र आणणारी गाठ आहे. आजचं कौटुंबिक जीवन असं झालं आहे. जोवर आपण एकमेकांचं मन पूर्णपणे जाणून घेत नाही तोवर प्रेम हे केवळ हृदयात बंदिस्त करून ठेवणं पुरेसं नाही. आपण ते शब्द आणि कृतीतून व्यक्त करायलाच हवं. अम्मा हे सगळं कौटुंबिक जीवनातली शांती आणि आनंदासाठी सांगतात. तसं न करणं हे तहानेने व्याकूळ माणसाच्या हातात बर्फाचा खडा ठेवण्यासारखं आहे. त्यानं त्याची तहान भागणार नाही. म्हणूनच पुरुषांनी स्त्रियांच्या समान पातळीवर उतरायला हवं. त्यांनी एकमेकांवर खुल्या मनानं प्रेम करायला हवं आणि एकमेकांना समजून घ्यायला हवं..