शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

" आ चल - मैं तुझे , मैं लेके चलूँ , एक ऐसे गगन के तले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 8:06 PM

ताणतणावाच्या या स्पर्धेच्या युगात आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला सबळ व निर्मळ करणं ही अत्यावश्यक बाब..

- डॉ . दत्ता कोहिनकर -अपयशाने खचलेला, भविष्यातील करियरच्या चिंतेने नैराश्यात गेलेला तरुण, प्रेमभंग असह्य झाल्याने किंवा घटस्फोटामुळे आत्महत्यापर्यंतचा विचार करणारी मुले - मुली , दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे संसार रस्त्यावर यायची वेळ आलेली तरुण जोडपी , शिक्षणात अपयश , बेरोजगारी , मानसिक आजाराने त्रस्त झालेला युवा वर्ग , घरात होणाऱ्या त्रासाने घुसमटलेले स्त्री - पुरुष , न्युनगंड व भित्रा स्वभाव यामुळे आत्मविश्वास गमावलेले व जगायचं कशासाठी ? या विचारांनी अर्धमेले झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी या सगळ्यांचे समाजातील प्रमाण खूप झपाट्याने वाढते आहे.

त्याचसोबत पोटच्या मुलाकडून - सुनेकडून होणाऱ्या छळाला वैतागलेले आजी - आजोबा , वासनेने , क्रोधाने , द्वेष, लोभाने पछाडलेले मन , त्यामुळे जीवनात झालेली घालमेल - नैराश्य , दु : ख , वैफल्यता अशा अनेक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी निरनिराळ्या मार्गाचा शोध घेणारी मंडळी विपश्यना ध्यान केंद्रावर जातात. तिथे  कृतज्ञतेचा भाव जागतो आणि शिबिर संपताना डोळ्यातून अश्रू ओघळतात , मन शांत व निर्मळ झालेले असते .

       २५०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी ' विपश्यना ' ही महासंजीवनी शोधून काढली . ही शास्त्रोक्त साधना असून , कालांतराने भारतातून लुप्त झाली . १९६९ मध्ये पूज्य आचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजीनी म्यानमारमधून भारतात आणली व प्रशिक्षण कार्यास आरंभ केला . इगतपुरी हे प्रमुख केंद्र असून जगात जवळजवळ १८० केंद्रे विनामूल्य चालविली जातात. ताणतणावाच्या या स्पर्धेच्या युगात आनंदाने जीवन जगण्यासाठी मनाला सबळ व निर्मळ करणं ही अत्यावश्यक बाब असल्यामुळे , मित्रांनो दहा दिवसासाठी नक्कीच मनाच्या व्यायामशाळेत जा ! मनाच्या व्यायामशाळेत जाता जाता आपण या मनासाठी एकच गाणं म्हणू या - " आ चल - मैं तुझे , मैं लेके चलूँ , एक ऐसे गगन के तले , जहाँ गम भी ना हो - आँसू भी ना हो , बस प्यार ही प्यार पले । "

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाrelationshipरिलेशनशिप