शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 8:47 PM

दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात.

- डॉ. दत्ता कोहिनकर कुटूंबातील आई-वडिलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलही अभ्यासात हुशार..  दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तान बसवले. दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटला, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं.  अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहचला. दोन दिवस थांबून त्याने वडलांच्या हातावर एक लाख रूपये ठेवले व त्यानंतर म्हणाला ह्यह्यबाबा मी निघतोय, आज रात्रीची फ्लाईट आहे.  दुःखी कष्टी बाबा न राहवून बोलले, अरे तू आलास पण तुझा दादा ? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, ह्यह्यत्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्याने त्याला येणे शक्य नव्हते.ह्णह्ण तोच म्हणाला, ह्यह्ययावेळी तू जा-बाबांच्या वेळी मी जाईन.ह्णह्ण बाबा आतल्या आत उन्मळून पडले. डोळयांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या. उच्चशिक्षण मी दोनही मुलांना देऊ शकलो पण कर्तव्य व माणूसकीचे अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही या विचारांनी त्यांचे अंतःकरण उव्दीग्न झाले.  पूर्वी लोक कमी शिकलेली होती. वाडयात एका घरात एखादी व्यक्ती देवाघरी गेली (मयत झाली) तर सगळया वाडयात सुतक असायचे. कोणीही आपल्या घरात रेडिओ देखील लावत नसत. ज्या घरात मयत झाली त्या घरातील लोकांना शेजारी-पाजारी, न्याहारी, भोजन आणून खावयास लावत व मयताच्या सगळया विधीमध्ये वाडयातील लोकांचा सहभाग असे. वाडा हेच एक कुटूंब असतं. आज लोक खूपच शिकतात. पण खालच्या मजल्यावर मयत झाली असेल तर चौथ्या मजल्यावर दार बंद करून श्रीखंड - पुरीचे जेवण चाललेले असते. दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. बिल्डींगमधील लोकांची नावे पण बर्‍याच जणांना माहीत नसतात, असे शिक्षण काय कामाचे ?  आज मुलांना चारित्र्य घडवणारे व मानसिक बल वाढवून, बुद्धी विशाल करणारे, नैतिक मूल्य जोपासणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे करूणा - मैत्री - मुदीता - उपेक्षा - निःस्वार्थ वृत्ती उदयास येते असे शिक्षण आज लुप्त झाले आहे.  माणसाच्या मनात दुसर्‍याविषयी आदर -सेवाभाव - मैत्री निर्माण करून माणसाने - माणसाशी - माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे. कृतज्ञता जागवणारे शिक्षण आज दिले गेले पाहिजे.  एक तारखेला पगार घेणे व आयुष्यभर दाराला आतुन कडी लावून घेणे, रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला तरी मला काय घेणे आहे,  या विचारसरणीचे उच्चाटन करणारे शिक्षण आजच्या शाळेत शिकवायला हवे. कर्मवीर भाऊराव  पाटील मुलांना झोपडी बांधायला शिकवत, स्वयंपाक करायला, शब्दकोश पाहायला शिकवत, रविंद्रनाथ टागोर विदयार्थ्यांना नमह्यपणे सर्व प्रकारची कामे करायला शिकवत. इंदिरा गांधीना टागोरांच्या संस्थेत पाठवताना नेहरूंनी टागोरांना कळवले होते,तिला हाताने काम करू दया, डोळयाने जग पाहू दया मनाने विचार करू दया. माझी मुलगी म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत तिला देऊ नका. अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं व विषम परिस्थितीत कस वागायचं हे शिकवा असा आग्रह केला होता.  आज जास्त शिकलेली लोक भौतिक जगात अन्यायाविरूध्द दंड थोपटण्यास पुढे येत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे  - ते जो पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निस्वार्थता, सेवाभाव, चारित्र्य, नैतिकता, संघभावना, देशप्रेम, शुध्दता,कर्तव्यभावना, करूणा, मैत्री, कृतज्ञता यांचे संमिश्र शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी चित्त शुध्द करा.मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ असे स्वाभिमानपूर्वक सांगणारे तुकाराम महाराज देखील आवाहन करतात, सकळांच्या पाया माझे दंडवत । आपले चित्त शुध्द करा या चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे*.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणMeditationसाधना