-डॉ दत्ता कोहिनकर
मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. व्यवस्थापन व संघटनेने खुपदा समजावलं, पण जगायचच नाही म्हणतोय! स्वत:च्या पत्नीविषयी खूपच गैरसमज व संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले आहे, एकदा तर त्याने आत्महत्यतेचा देखील प्रयेत्न्न केला होता, सर त्याला लहान मुलं आहेत.
त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आपली मदत हवी आहे. अव्दैताच्या या मित्राला अविनाशला कुटुंबासह भेटायला बोलावले व समजावल्यावर अविनाशला दहा दिवसीय विपश्यनेच्या शिबिराला बसवले. त्याचे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण झाले. विपश्यनेच्या दैनदिन सरावानंतर मन सबळ व निर्मल होत गेले. अविनाश नैराश्यातून बाहेर पडला, कामावर रुजू झाला. दारू बंद झाली. संशयाचे भूत मानगुटीवरून उतरले, स्वत:ला व इतरांना समजून घेण्याची मनोवृत्ती वाढली. आज सुखाने संसार चाललाय त्याचा.
अशीच एक घटना - एक साधिका मला म्हणाली " सर माझ्या मैत्रिणीला मी शिबिरासाठी आणले आहे. डॉ. शर्मिला, प्रेमभंग झालाय तिचा. खूप मानाने खचलिय. नैराश्य, व्याकुळता , मानसिक अस्वस्थेमुळे एकदा तर तिने झोपेच्या खूप गोळ्या खाल्या होत्या . तिला थोडी प्रेरणा व सहानुभूती देऊन मदत करावी. त्याप्रमाणे डॉ. शर्मिलाशी बोलणी केली. संवादातून " दुनिया मे इतना गम है - मेरा गम कितना कम है " हे तिला - उमगले शर्मिलाने विपश्यना शिबीर पूर्ण केले. आज ती खूप प्रसन्न आणि आनंदी असते. स्वत:ची वैधकिय प्रक्टिस तिने सुरु केलीय. दैनंदिन ध्यान करत असते.
मित्रांनो अनेक प्रकारची दु:खी कष्टी लोक विपश्यना ध्यान केंद्रावर (मनाच्या व्यायामशाळेत ) कोमजलेले दु:खी - खिन्न चेहरे घेऊन येतात व शिबीर संपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता - आनंद बघण्यासारखा असतो. अपयशाने - करीयरच्या चिंतेने , घटस्फोट, व्यसन, न्यूनगंड, भित्रा स्वभाव , आत्मविश्वासाचा अभाव, मानसिक व शारीरिक आजार, रागिंग , छळ , आर्थिक कमकुवतपणा, बेरोजगारी अशा अनेक कारणामुळे दिवसेंदिवस लोक आत्महत्येकडे वळत आहेत. याला प्रमुख कारण मनाची दुर्बलता हे आहे. २०११ मध्ये भारतात १ लाख ३५,५८५ जणांनी आत्महत्या केल्या. २०१० मध्ये
महाराष्ट्रात ६६ विध्यार्थ्यानी आत्महत्या केल्या आहेत. यावर लहान मुलांनसाठी आनापान ध्यान व १८ वर्षावरील व्यक्तीसाठी " विपश्यना शिबीर" हे उत्तम रामबाण औषध आहे. मनाची सबलता व निर्मलता वाढवून शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक प्रगती साधणारे हे विपश्यना ध्यान साधना २५०० वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शोधून काढली. पु. आचार्य सत्यनारायण गोयंकाजींच्या व्हीडीओ , ओडीओ च्या माध्यमातून हे ध्यान शिकवले जाते. राज्य सरकारने या साधनेला १४ दिवसांची परावर्तीत रजा मंजूर केली आहे. पुण्यात स्वारगेट व आळंदी जवळ मरकळ या गावी असलेल्या विपश्यना केंद्रावर हि शिबिरे विनामूल्य घेतली जातात.
जुन्या साधकांच्या दानावर सर्व काम चालते. दोन्ही केंद्रावर दरमहा ३०० लोक प्रतीक्षा यादीवर असतात .मित्रांनो सारा संसार मानवी मनाचा खेळ आहे. मन हे प्रमुख आहे. हजार युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो. म्हणतात ना - "मन करा से प्रसन्न - सर्व सिद्धीचे कारण" अशा या खचलेल्या - निराश - वैफल्यग्रस्त मनाला सबळ व निर्मल करून आनंदाने जीवन जगण्यासाठी एकदा का होईना या मनाच्या व्यायामशाळेत जा व जाता - जाता आपल्या मनाला हसतपणे सांगा ,
" आ चल मैं तुझे मैं लेके चलू ,
एक ऐसे गगन के तले ,
जहा गम भी ना हो - आसू भी ना हो ,
बस प्यार हि - प्यार पले