08 क. 21 मि. पर्यंत जन्मलेली मुलं मकर राशीची असतील. त्यानंतर मुलं कुंभ राशीत प्रवेश करतील. योजना आणि कल्पकता यातून मुलं प्रगती करू शकतील. सामाजिक आणि शास्त्रीय विषयांशी संपर्क येतील. माता पित्यास शुभ.
मकर राशी ज, ख.कुंभ राशी ग, स आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, दि. 1 एप्रिल 2019
- भारतीय सौर 11 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य द्वादशी अहोरात्र
- धनिष्ठा नक्षत्र 21 क. 54 मि., मकर चंद्र 08 क. 21 मि.
- सूर्योदय 06 क. 34 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
- भागवत एकादशी
दिनविशेष
1889 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांचा जन्म.
1928 - पुणे वेधशाळेच्या कामास प्रारंभ. देशातील हवामानाचा पहिला अहवाल वेधशाळेने प्रसिद्ध केला.
1935 - रिझर्व्ह बँकेची स्थापना.
1939 - लेखिका तारा भवाळकर यांचा जन्म.
1941 - कसोटीपटू अजित वाडेकर यांचा जन्म.
1989 - समाजवादी नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव उर्फ एस. एम. जोशी यांचे निधन.
2000 - कवयित्री संजीवनी मराठे यांचे निधन.