वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुलं निर्धार आणि कल्पकता यांच्या सहकार्याने आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षणातील प्रगती विशेष राहील. व्यवहारात अधिकार ते उद्योग असा प्रवास करता येऊ शकेल.
जन्माक्षर - वृश्चिक राशी न, य आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019भारतीय सौर 12 माघ 1940मिती पौष वद्य द्वादशी 19 क. 00 मि.मूळ नक्षत्र 21 क. 07 मि. धनु चंद्रसुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.
दिनविशेष
1884 - ऑक्सफर्ड डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
1894 - संस्कृत कोशकार सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म.
1907 - मुमुक्षु साप्ताहिक स्वरुपात संत वाड्मयाचे उपासक ल. रा. पांगारकर यांनी सुरू केले.
1927 - प्रा. डॉ. म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म.
1929 - ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा जन्म.
1944 - सुप्रसिद्ध पत्रकार अरुण टिकेकर यांचा जन्म.
1957 - चित्रपट अभिनेता जॅकी श्रॉफ याचा जन्म.
1971 - क्रिकेटपटू अजय जडेजा याचा जन्म.
1995 - नाचककार मो. ग. रांगणेकर यांचे निधन.