16 क. 58 मि. पर्यंत वृषभ राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर मिथुन राशीत राहतील. आधुनिकता आणि कल्पकता अशी प्रक्रिया त्यांचे कार्यवर्तुळात राहते. त्यातू परिचितांचा परिवार मोठा होतो.
वृषभ राशी - ब, व, ऊ
मिथुन राशी - क, छ, घ आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, दि. 14 मार्च 2019
- भारतीय सौर 23 फाल्गुन 1940- मिती फाल्गुन शुद्ध अष्टमी 27 क. 22 मि.
- मृग नक्षत्र 28 क. 42 मि., वृषभ चंद्र 16 क. 58 मि.- सूर्योदय 06 क. 49 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि.
- दुर्गाष्टमी
दिनविशेष
1883 - साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते कार्ल मार्क्स यांचे निधन.
1931 - आलमआरा पहिला भरातीय बोलपट चित्रपटगृहात सादर.
1931 - ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म.
1965 - अभिनेता आमीर खान याचा जन्म.
1973 - निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा जन्म.
1998 - अभिनेते, दिग्दर्शक, 1970 नंतरच्या कालखंडातील यशस्वी निर्माते दादा कोंडके यांचे निधन.
2003 - गझलसम्राट सुरेश भट यांचे निधन.
2010 - ज्ञानपीठप्राप्त कवी विंदा करंदीकर यांचे निधन.