वृषभ राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शुक्र योगामुळे आधुनिक विचारांची, प्रयत्नाने यश संपादन करणारी राहतील. गुरुकृपेने त्यात व्यापकता येईल. संपर्क आणि कार्यमार्ग यातून नवा प्रवाह निर्माण करता येईल. जन्मनाव - ब, व, ऊ आद्याक्षरे
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार 17 जानेवारी 2019भारतीय सौर 27 पौष 1940मिती पौष शुद्ध एकादशी 22 क. 35 मि.कृतिका नक्षत्र 13 क. 40. मि, वृषभ चंद्रसूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.पुत्रदा एकादशी
दिनविशेष
शुकंतला परांजपे यांची जयंती
1895 कवि, लेखक, विठ्ठल दत्तात्रेय तथ वि.द. घाटे यांचा जन्म1905 जागतिक किर्तीचे गणितज्ञ द.रा. कापरेकर यांचा जन्म. 1918 चित्रपट निर्माता, कवी कमाल अमरोही यांचा जन्म. 1906 कुटुंब नियोजनाचा प्रचार करणाऱ्या शकुंतला परांजपे यांचा जन्म. 1913 क्रिकेटपटू यादवेंद्रसिंह यांचा जन्म1930 प्रसिद्ध गायिका, नृत्यांगणा गौहर खान यांचे म्हैसूर येथे निधन. 2000 गायक सुरेश हळदणकर यांचे निधन. 2013 प्रसिद्ध साहित्यिक जोत्सना देवधर यांचे निधन.