30 क. 39 मि. पर्यंत धनु राशीची मुलं असतील. पुढे मकर राशीची मुलं राहतील. शुक्र-हर्षल नवपंचमयोगामुळे चकित करणारे यश संपादन करीत मुलं आगेकूच सुरू ठेवतील. प्रलोभनापासून मात्र दूर असावे. कला, साहित्य, सांस्कृतिक कार्याशी संबंध शक्य आहे.
जन्माक्षर - धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019भारतीय सौर 13 माघ 1940मिती पौष वद्य त्रयोदशी 21 क. 19 मि.पूर्वाषाढा नक्षत्र 23 क. 55 मि. धनु चंद्र 30 क. 39 मि. सुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.
दिनविशेष
1884 - ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म.
1917 - लोकमान्यांचे सहकारी अण्णासाहेब तथा विनायक रामचंद्र पटवर्धन यांचे निधन.
1930 - आनंद मासिकाचे संपादक वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन.
1990 - आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरील बंदी उठवून नेल्सन मंडेला यांच्या सुटकेचे आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दिले.
2007 - हिंदी चित्रपट अभिनेता विजय अरोरा यांचे निधन.