सिंह राशीत जन्मलेली आजची मुलं बुध-नेपच्यून शुभयोगामुळे वेगवान विचारांची असतील. परिश्रमाने कार्यप्रांत उभे करतील, हाच योग शिक्षणात सहकार्य करणारा आहे.
सिंह राशी म,ट आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 20 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 01 फाल्गुन 1940
- मिती माघ वद्य प्रतिपदा, 17 क. 37 मि.- मघा नक्षत्र 08 क. 00 मि., सिंह चंद्र
- सूर्योदय 07 क. 0५ मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.
- गुरु प्रतिपदा
दिनविशेष
1909 - भारतीय सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.
1950 - सुभाषचंद्र बोस यांचे जेष्ठ बंधू देशभक्त शरदचंद्र बोस यांचे निधन.
1956 - प्रसिद्ध अभिनेता अन्नू कपूर यांचा जन्म.
1962 - मर्क्युरी अवकाशयानातून जॉन ग्लेन अवकाशवीराने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा केली.
1973 - अभिनेता प्रियांशू चॅटर्जी याचा जन्म.
1974 - संपादक व नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.
1994 - चरित्रकार, घटनातज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.