21 क. 35 मि. पर्यंत सिंह राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर मुलं कन्या राशीत प्रवेश करतील. निर्धार आणि निष्ठा यांना मिळणारे ग्रहांचे सहकार्य यश सोपे करणारे ठरेल. विशेष यशासाठी परिश्रम घ्यावे लागतील. बुध-शनि शुभयोग त्यात सहभागी राहील.
सिंह राशी - म, टकन्या राशी - प, ठ, ण आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 20 मार्च 2019
- भारतीय सौर 29 फाल्गुन 1940
- मिती फाल्गुन शुद्ध चतुर्दशी 10 क. 44 मि.
- पूर्वा नक्षत्र 16 क. 17 मि., सिंह चंद्र 21 मि. 35 मि.
- सूर्योदय 06 क. 44 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
- हुताशनी पौर्णिमा (होळी)
दिनविशेष
1911 - नाट्य समीक्षक, मराठी साहित्यिक माधव मनोहर यांचा जन्म.
1920 - प्रख्यात नाटककार, कादंबरीकार वसंत शंकर कानेटकर यांचा जन्म.
1921 - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांचा जन्म.
1951 - भारताचा माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा यांचा जन्म.
1952 - भारताचा माजी टेनिस खेळाडू आनंद अमृतराज याचा जन्म.
1956 - अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांचे निधन.
2014 - पत्रकार, कादंबरीकार खुशवंत सिंह यांचे निधन.