कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शनि-मंगळ केंद्रयोगाचे परिणाम मधून मधून अस्वस्थ करीत राहतील. काही अस्थिरतेचे पर्व त्यात असतात. पंचमात गुरू यशमार्ग निर्दोष करण्यात सहकार्य करणार आहे.
जन्मनाव - कर्क राशी - ड, ह आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
सोमवार, 21 जानेवारी 2019भारतीय सौर 01 माघ 1940मिती पौष शुद्ध पौर्णिमा 10 क. 46 मि.पुष्य नक्षत्र 26 क. 27. मि, कर्क चंद्र सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 24 मि.शाकंभरी पौर्णिमा
दिनविशेष
1894 - कवी माधव ज्युलियन यांचा जन्म.
1898 - अभिनेते मास्टर कृष्णराव यांचा जन्म.
1910 - गीतकार, लेखक व दिग्दर्शक शांताराम आठवले यांचा जन्म.
1924 - माजी केंद्रीय मंत्री, समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांचा जन्म.
1945 - क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे निधन.
1959 - दिग्दर्शक , पटकथा लेखक, बायबलवरील भव्य चित्रपटांचा निर्माता सेसिल बी. दमिल यांचे निधन.
1972 - मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.