22 क. 02 मि. पर्यंत कन्या राशीतील मुलं असतील. त्यानंतर तुला राशीत मुलं सामाविष्ट होतील. सफलतेचा अधिकाधिक प्रवास कष्टसाध्य राहील, आधुनिक तंत्रांनी करता येईल. परिचित आणि प्राप्ती प्रभाव निर्माण करील.
कन्या राशी प, ठ, ण
तुला राशी र, त आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, दि. 22 मार्च 2019
- भारतीय सौर 01 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य द्वितीया 24 क. 56 मि.
- हस्त नक्षत्र 11 क. 06 मि., कन्या चंद्र 22 मि. 02 मि.
- सूर्योदय 06 क. 43 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.
- तुकाराम बीज
दिनविशेष
1832 - जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक योहान वोल्फ-गांग वोन गटे यांचे निधन.
1924 - नाटककार, पटकथाकार मधुसूदन रामचंद्र कालेलकर यांचा जन्म.
1949 - माध्यमिक शालांत परीक्षेची सुरुवात
1957 - शकावर आधारलेले राष्ट्रीय पंचांग भारताने स्वीकारले.
1984 - मराठी लेखक, पत्रकार प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचे निधन.
2001 - अॅनिमेशन फिल्म निर्माता विल्यम हाना याचे निधन. ज्याने योगी बिअर, स्कुबी डू आणि फ्लिंटस्टोन्स ही जगप्रसिद्ध अॅनिमेटेड कॅरेक्टर्स उभी केली.
2004 - स्वातंत्र्यसेनानी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विठ्ठल महादेव तारकुंडे यांचे निधन.