11 क. 27 मि. पर्यंत कन्या राशीची मुलं राहतील. पुढे तुला राशीत मुलांचा समावेश होईल. वेगवान विचार आणि आधुनिक उपक्रम यामधून यश संपादन करता येईल. त्यात शिक्षण, प्रांत राहील आणि व्यावहारिक वर्तुळ राहतील.
कन्या राशी प, ठ, ण, तुला राशी र, त आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 04 फाल्गुन 1940- मिती माघ वद्य चतुर्थी, 08 क. 11 मि.- चित्रा नक्षत्र 22 क. 47 मि.- कन्या चंद्र 11 क. 27 मि.- सूर्योदय 07 क. 04 मि., सूर्यास्त 06 क. 41 मि.
दिनविशेष
1876 - प्रख्यात समाजसेवक डेबूजी झिंगराजी जाणोरकर तथा संत गाडगे महाराज यांचा जन्म.
1904 - समाजसुधारक, विज्ञानप्रसारक महेंद्रलाल सरकार यांचे निधन.
1905 - रोटरी क्लबची युनायटेड स्टेट्समध्ये स्थापना. 1922 पासून रोटरी इंटरनॅशनल नावाने ही संस्था ओळखळी जाते.
1954 - पीटसबर्ग येथे प्रथमच पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
1969 - प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांचे निधन.
1979 - अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनन हिचा जन्म.
2004 - दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन.