तुला राशीत जन्मणारी आजची मुलं आधुनिक विचार, अभिनव उपक्रम यामधून मोठी परिचित वर्ग निर्माण करतील. शिक्षणातील प्रगती चांगली राहील. व्यावहारिक व्यवहार प्रवास प्राप्ती मजबूत करणारा असेल.
तुला राशी र, त आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, दि. 23 मार्च 2019
- भारतीय सौर 02 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य तृतीया 22 क. 32 मि.
- चित्रा नक्षत्र 09 क. 05 मि., तुला चंद्र
- सूर्योदय 06 क. 42 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.
दिनविशेष
1910 - स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचा जन्म.
1916 - भारतीय कम्युनिस्ट नेते हरकिसनसिंग सूरजित यांचा जन्म.
1931 - क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशी.
1959 - कादंबरीकार कृष्णाजी महादेव चिपळूणकर यांचे निधन.
1980 - प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय ठरले.
1987 - चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिचा जन्म.
2007 - मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण तथा श्री. ना. पेंडसे यांचे निधन.
2008 - मराठी कलाकार गणपत पाटील यांचे निधन. तमाशप्रधान अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.