आजची मुलं वृश्चिक राशीत जन्मलेली असतील. ते नवीन नवीन कार्यमार्ग शोधतील आणि अभिनव उपक्रमातून त्यांना सफलता संपादन करता येईल. शिक्षण, उद्योगात प्रभाव राहील.
वृश्चिक राशी न, य आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
मंगळवार, दि. 26 मार्च 2019
- भारतीय सौर 05 चैत्र 1941- मिती फाल्गुन वद्य षष्ठी 20 क. 02 मि.- अनुराधा नक्षत्र 07 क. 15 मि., वृश्चिक चंद्र- सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.- श्री एकनाथ षष्ठी
दिनविशेष
1907 - स्वातंत्र्यसैनिक, हिंदी कवयित्री, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म.
1910 - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडीची स्थापना केली.
1938 - ज्येष्ठ असमिया साहित्यिक लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांचे निधन.
1939 - ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांचा जन्म.
1996 - भारतीय चित्रकार के. के हेब्बर यांचे निधन.
2008 - प्रसिद्ध दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांचे नाशिक येथे निधन.
2012 - सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे निधन. त्यांचे संपूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे होते.