19 क. 23 मि. पर्यंत मुलं धनु राशीची असतील. त्यानंतर मकर राशीची मुलं जन्म घेतील. विचारात सात्विकता असते आणि व्यवहार असतो. त्यामुळे आजची मुलं अनेक प्रांतात चमकतील. शिक्षणात, प्राप्तीमध्ये अनुकूलता निर्माण होत राहील.
धनु राशी भ, ध
मकर राशी ज, ख अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, दि. 29 मार्च 2019
- भारतीय सौर 08 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य नवमी 24 क. 48 मि.
- पूर्वाषाढा नक्षत्र 12 क. 41 मि., धनु चंद्र 19 क. 23 मि.
- सूर्योदय 06 क. 37 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
दिनविशेष
1853 - स्टेरिओस्कोपिक एक्स- रे फोटोग्राफीचे जनक थोर शास्त्रज्ञ इल्ह्यू थॉमसन यांचा जन्म.
1869 - राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली शहराचा आराखडा तयार करणाऱ्या सर एडविन ल्युथेन्स या आर्किटेक्टचा जन्म.
1874 - बालसाहित्य व कथालेखिका काशीबाई श्यामराव हर्लेकर यांचा जन्म.
1926 - विनोदी कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, प्रवासवर्णनकार बाळ गाडगीळ यांचा जन्म.
1929 - अभिनेता उत्पल दत्त यांचा जन्म.
1948 - 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले यांचा जन्म.
1982 - एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.