मकर राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांजवळ हुशारी, कर्तृत्व, प्रभाव अशी अस्त्र असून मधूनमधून वादळशी सामना करावा लागेल आणि यश मिळवावे लागेल. सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी संबंध येईल.
मकर राशी ज, ख आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
रविवार, दि. 3 मार्च 2019
- भारतीय सौर 12 फाल्गुन 1940- मिती माघ वद्य द्वादशी, 13 क. 45 मि.
- उत्तराषाढा नक्षत्र 08 क. 59 मि., मकर चंद्र - सूर्योदय 06 क. 58 मि., सूर्यास्त 06 क. 44 मि.- प्रदोष
दिनविशेष
1839 - टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म.
1919 - श्रेष्ठ कादंबरीकार, अकोले येथील 8 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरी नारायण आपटे यांचे निधन.
1920 - किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
1923 - इतिहासकार, ललित लेखक, प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
1928 - कवी व लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
1967 - खासदार, माजी अर्थमंत्री स. गो. बर्वे यांचे निधन.
1967 - प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
2000 - रंजना देशमुख हिचे निधन.