आजची मुलं मकर राशीची आहेत. रवि-चंद्र शुभयोग आणि चंद्र-मंगळ त्रिकोण प्रगतीसाठी अधिकाधिक सहकार्य करतील. त्यात प्रयत्नांचा वेग व्यापकता निर्माण करू शकेल. शिक्षण आणि उद्योग, समाजकार्ये यात यश आकर्षक राहील.
मकर राशी ज, ख अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शनिवार, दि. 30 मार्च 2019
- भारतीय सौर 09 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य दशमी 27 क. 23 मि.
- उत्तराषाढा नक्षत्र 15 क. 38 मि., मकर चंद्र
- सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
दिनविशेष
1699 - शीख धर्मगुरु श्री गुरु गोविंदसिंग यांनी खालसा संस्थेची स्थापना केली.
1908 - प्रख्यात चित्रपट अभिनेत्री देवकाराणी यांचा जन्म.
1909 - लेखक व कादंबरीकार शंकर दाजीशास्त्री पदे यांचे प्रयाग येथे निधन.
1942 - मराठी लेखक वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.
1969 - कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन.
1989 - ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व सोबत या साप्ताहिकाचे संपादक ग. वा. बेहरे यांचे पुणे येथे निधन.
1993 - रंगांचे जादूगार व नामवंत चित्रकार एस. एम. पंडित यांचे निधन.
2002 - हिंदी चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे निधन.