18 क. 40 मि. पर्यंत जन्मलेली मुलं वृश्चिक राशीत असतील. त्यानंतर धनु राशीची मुलं जन्म घेतील. शनि-नेपच्यून लाभयोगाचे विशेष प्रतिसाद सफलता ते संपन्नता असा प्रवास सुरू ठेवता येईल. कला, साहित्य विभागाशी संपर्क येतील.
जन्माक्षर - वृश्चिक राशी - न, य व धनु राशी - भ, ध अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
गुरुवार, 31 जानेवारी 2019भारतीय सौर 11 माघ 1940मिती पौष वद्य एकाशमी 17 क. 02 मि.जेष्ठा नक्षत्र 18 क. 40 मि. वृश्चिक चंद्र 18 क. 40 मि.सुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.
दिनविशेष
1896 - ज्ञानपीठप्राप्त कन्नड साहित्यिक द. रा. बेंद्रे यांचा जन्म.
1920 - डॉ. आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात.
1931 - कवी आणि साहित्यिक गंगाधर महांबरे यांचा जन्म.
1963 - मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.
1975 - अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा जन्म.
2000 - अभिनेते के. एन. सिंग यांचे निधन.
2001 - नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन.
2004 - अभिनेत्री सुरय्या यांचे निधन.