कुंभ राशीत जन्मलेली आजची मुलं प्रगल्भ विचारांची आणि विज्ञानाच्या मार्गांनी यश संपादन करीत राहतील. त्यातच शिक्षण, प्रभाव, अधिकार, मोठे संपर्क अशा विभागांचा समावेश राहील.
कुंभ राशी ग, स आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 6 मार्च 2019
- भारतीय सौर 15 फाल्गुन 1940- मिती माघ वद्य अमावास्या, 21 क. 34 मि.
- शततारका नक्षत्र 18 क. 13 मि., कुंभ चंद्र - सूर्योदय 06 क. 56 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि.
दिनविशेष
1899 - चरित्रकार व संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
1957 - क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.
1965 - प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.
1967 - प्रख्यात कर्तबगार प्रशासक सदाशिव गोविंद बर्वे यांचे निधन.
1971 - सुनील गावस्कर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळले.
1982 - आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.
1992 - सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजित देसाई यांचे निधन.
2005 - देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे कार्यान्वित.