आज जन्मलेली मुले - ७ क. १० मि. पर्यंत तुला राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे मुले वृश्चिक राशीत प्रवेश करतील. अभिनव व्यावहारिक विचार आणि जिद्दीने आपला प्रभाव निर्माण करणे असे कार्यमार्ग मुलांचे राहतील. गुरुकृपेने यश मिळेल. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग बुधवार २ ऑक्टोबर २०१९भारतीय सौर १० आश्विन १९४१मिती आश्विन शुद्ध चतुर्थी ११ क. ४० मि. विशाखा नक्षत्र १२ क. ५२ मि., तुला चंद्र ०७ क. ३० मि.सूर्योदय ०६ क. ३० मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि. विनायकी चतुर्थी, ललिता पंचमी
दिनविशेष- १८६९- राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी तथा महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म१९०४- माजी पंतप्रधान लालबहादूर यांचा जन्म१९०६- चित्रकार राजा रविवर्मा यांचे निधन१९०८- ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत गं. बा. सरदार यांचा जन्म१९३०- क्रिकेटपटू जयसिंगराव घोरपडे यांचा जन्म१९३९- क्रिकेटपटू बुधी कुंदरन यांचा जन्म१९४६- चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म१९७१- संगीतकार कौशल इनामदार यांचा जन्म