20 क. 53 मि. पर्यंत आज जन्मलेली मुले वृषभ राशीत असतील. त्यानंतर मुलं मिथुन राशीत प्रवेश करतील. अभिनव उपक्रम आणि बौद्धिक प्रवाह यामुळे यश संपादन करता येईल. कला साहित्याच्या विषयात प्रभाव निर्माण करता येईल. प्रलोभनापासून फक्त दूर राहा.
जन्माक्षर वृषभ- ब, व, ऊ. मिथुन क, छ, घ अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, दि. 1 जुलै 2019भारतीय सौर, 10 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य चतुर्दशी 27 क. 6 मि.रोहिणी नक्षत्र 9 क. 25 मि. वृषभ चंद्र 20 क. 53 मि.सूर्योदय 06 क. 6 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि. शिवरात्र
दिनविशेष
1909 - क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंडिया ऑफिसचे राजकीय ए.डी. सी. सर विल्यम कर्झन वायली यांची हत्या केली.
1913 - माजी मुख्यमंत्री, कृषितज्ञ हरितक्रांतीचे व रोजगार हमीचे जनक वसंतराव फुलसिंग नाईक यांचा गहुली येथे जन्म.
1918 - गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गोपाळ गायन समाजाची स्थापना केली.
1927 - माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा जन्म.
1938 - प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.