मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-चंद्र प्रतियोगाचे मिळणारे सहकार्य अनन्यसाधारण गुण भांडार निर्माण करणारे राहील. प्रयत्नाने त्यात विद्या, प्रवास, व्यवसाय यांचा समावेश होईल. मात पित्यास शुभ.
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
भारतीय सौर 20 पौष 1941
मिती पौष शुद्ध पौर्णिमा 24 क. 51 मि.
आर्द्रा नक्षत्र, 14 क. 49 मि., मिथुन चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 17 मि.
शाकंबरी पौर्णिमा
दिनविशेष
1896 - वस्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म.
1901 - इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांचा जन्म.
1919 - संस्कृत अभ्यासक, लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
1940 - पार्श्वगायक येशू दास यांचा जन्म.
1942 - संत साहित्यिक डॉ. अशोक कामत यांचा जन्म.
1950 - समाजसेविका नजूबाई गावित यांचा जन्म.
1974 - अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म.
2002 - ख्यालगायक पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर व्यास यांचे निधन.