कन्या राशीत जन्मणारी आजची मुले विचारी असतील. व्यापारी प्रवृत्तीची राहतील. बुध नेपच्यून सफलता सोपी करणारे सहकार्य करील. कार्यपद्धतीत चंद्र, शुक्र नवपंचम योगामुळे आधुनिकता असते.
कन्या राशी - प, ठ अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, दि. 11 जून 2019
भारतीय सौर, 21 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध नवमी 20 क. 20 मि.
उत्तर नक्षत्र 13 क. 1 मि. कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 15 मि.
महेश नवमी
दिनविशेष
1924 - मराठी नाटककार वासुदेव वामनशास्त्री खरे यांचे निधन.
1931 - संपादक व कथा, कादंबरीकार पुरुषोत्तम विष्णू बेहरे यांचा जन्म.
1950 - साहित्यिक, सुचितेचे उपासक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचे निधन.
1964 - गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणातून उद्भवणारे आकुंचन हा प्रबंध लंडनच्या रॉयल सोसायटी संस्थेस सादर केला.
1983 - बिर्ला उद्योगसमुहाचे उद्योगपती, पद्मविभूषण घनश्यामदास बिर्ला यांचे निधन.
1997 - इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मीहिर सेन यांचे निधन.