23 क. 21 मी. पर्यंत कन्या राशीत जन्मणारी मुले असतील. त्यानंतर मुलं तुला राशीत असतील. विचारांचा वेग आणि कृतीत आधुनिकता यामधून मुलांचा प्रवास कमी अधिक सफल होत राहील. प्रयत्नाने त्यात प्रशंसाही निर्माण करता येईल.
कन्या राशी - प, ठ
तुला राशी - र, त.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 12 जून 2019
भारतीय सौर, 22 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध दशमी 18 क. 27 मि.
हस्त नक्षत्र 11 क. 51 मि. कन्या चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 15 मि.
दशहरा समाप्त
दिनविशेष
1858 - संस्थानाधिपती बाबासाहेब भावे यांना ब्रिटीशांनी फासावर लटकवले.
1894 - पाली भाषातज्ञ पु. वि. बापट यांचा जन्म.
1905 - नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात भारत सेवक समाज संस्था स्थापन केली.
1917 - साहित्यिक भा. द. खेर यांचा जन्म.
1964 - मराठी भाषाशास्त्रज्ञ व ग्रंथकार कृष्णाजी पांडुरंग तथा कृ. पां. कुलकर्णी यांचे निधन.
2000 - बहुआयामी आणि महाराष्ट्राचे अत्यंत लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे निधन.