तुळ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-बुध आणि चंद्र हर्षल योगामुळे विचार ते स्थिरता या संबंधात सावध राहून कार्यभाग साधावा लागेल. सफलता संपादन करणारी कुशलता मुलांजवळ राहील.
तुळ राशी र, त अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 25 माघ 1941
मिती माघ वद्य षष्ठी 18 क. 21 मि.
चित्रा नक्षत्र, 07 क. 28 मि., तुला चंद्र
सूर्योदय 07 क. 9 मि., सूर्यास्त 06 क. 34 मि.
दिनविशेष
1916 - प्रसिद्ध लेखिका, कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.
1925 - माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचा जन्म.
1933 - सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला हिचा जन्म.
1974 - आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन.
1987 - विनोदी अभिनेते अनंत धुमाळ यांचे निधन.
1989 - युनियन कार्बाइड कंपनीने भोपाळ दुर्घटनेबद्द्ल भारत सरकारला 47 कोटी अमेरिकन डॉलर नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले.
व्हॅलेंटाईन डे