कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरुकृपेने शिक्षणात प्रगती करता येईल. नोकरी, उद्योगात मानाचे स्थान पटकवता येईल. परिवाराशी प्रेमाचा संपर्क राहील. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल.
कन्या राशी प, ठ, न अक्षर.
अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 15 मे 2019
भारतीय सौर, 25 वैशाख 1941
मिती वैशाख शुद्ध एकादशी 10 क. 36 मी.
उत्तरा नक्षत्र 7 क 16 मि. कन्या चंद्र
सूर्योदय 06 क 6 मि., सूर्यास्त 07 क. 5 मि.
दिनविशेष
1817 - बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म.
1864 - हिंदी साहित्यिक महावीर प्रसाद द्विवेदी यांचा जन्म.
1885 - प्रसिद्ध लेखक व नाटककार विठ्ठल सीताराम गुर्जर यांचा जन्म.
1903 - साक्षेपी व समतोल समालोचक, व्यासंगी साहित्यशास्त्रज्ञ रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म.
1907 - प्रसिद्ध क्रांतिकारक सुखदेव यांचा जन्म.
1967 - सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा जन्म.
1992 - कोल्हापूर आकाशवाणीचे केंद्र कार्यान्वित.
1993 - स्वतंत्र भारताचे पहिले फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन.