कुंभ राशीत जन्मणाऱ्या आजच्या मुलांना चंद्र-हर्षल शुभयोगाचा अलभ्य लाभ मिळणार आहे. प्रगल्भ बुद्धिमत्ता, शिक्षणात विज्ञानाशी संपर्कता, अनपेक्षित संधीतून नवनवीन कार्यप्रांतात प्रवेश अशा घटकांचा त्यात समावेश राहील. बुध हर्षल केंद्रयोगामुळे अस्थिरता नियंत्रणात ठेवावी लागते.
कुंभ राशी ग, स अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट 2019
भारतीय सौर, 25 श्रावण 1941
मिती श्रावण वद्य प्रतिपदा 20 क. 22 मि.
धनिष्ठा नक्षत्र 10 क. 56 मि. कुंभचंद्र
सूर्योदय 06 क. 21 मि., सूर्यास्त 07 क. 05 मि.
दिनविशेष
1879 - चरित्रकार, लेखक, पत्रकार ज. र. आजगावकर यांचा जन्म.
1952 - ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.
1954 - प्रसिद्ध पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.
1957 - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा जन्म.
1968 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.
1970 - अभिनेत्री मनीषा कोईराला हिचा जन्म.
1997 - प्रख्यात सुफी गायक नुसर फतेह अली खान यांचे निधन.
2000 - ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन.