मीन राशीत जन्मलेली मुले 22 क. 28 मि. पर्यंतची असतील. पुढे मेष राशीत मुलांचा समावेश राहील. श्रद्धा आणि जिद्द असे कार्यामार्गाचे स्वरूप राहील आणि प्रशंसनीय यशाने व्यावहारिक वर्तुळात प्रवळ यश मिळवतील.
मीन राशी द, च अद्याक्षर मेष राशी अ, ल अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2019
भारतीय सौर, 29 श्रावण 1941
मिती श्रावण वद्य पंचमी अहोरात्र.
रेवती नक्षत्र 22 क. 28 मि. मीन चंद्र 22 क. 28 मि.
सूर्योदय 06 क. 22 मि., सूर्यास्त 07 क. 02 मि.
दिनविशेष
1937 - कथा-कादंबरीकार प्रतिभा रानडे यांचा जन्म.
1944 - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म.
1946 - इन्फोसिस टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांचा जन्म.
1984 - जगप्रसिद्ध जादूगार रघूवीर यांचे पुणे येथे निधन.
2013 - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या.
2013 - कालनिर्णय दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे निधन.
2014 - प्रख्यात योगगुरू बी. के. अय्यंगार यांचे निधन.