मकर राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगल-हर्षल केंद्र योगाचे आव्हान मिळणार आहे. संयम आणि शिस्त यांच्या समन्वयातून त्याच्याशी यशस्वी सामना करता येईल आणि अवघड यश सोपे करू शकतील.
मकर राशी ज, ख अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 02 फाल्गुन 1941
मिती माघ वद्य त्रयोदशी 17 क. 22 मि.
उत्तरषाढा नक्षत्र, 09 क. 13 मि., मकर चंद्र
महाशिवरात्र
सूर्योदय 07 क. 4 मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.
दिनविशेष
1894 - प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म.
1941 - सर फ्रेड्रिक ग्रँट बँटिग यांचे निधन. त्यांना इन्सुलिनच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते.
1942 - मराठी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म.
1975 - अभिनेते गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन.
1977 - समीक्षक आणि 1960 साली झालेल्या 42 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र श्रीपाद जोग यांचे निधन.
1991 - प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांचे निधन.