कुंभ राशीत जन्मलेली मुले 27 क. 40 मिनिटपर्यंतची असतील. त्यानंतर मुले मीन राशीच्या संपर्कात राहतील. विज्ञान आणि परंपरा व्यवहाराची केंद्र असतील. समस्या आहेत. परंतु गुरुकृपेने यश संपादन करता येईल. सामाजिक कार्याशी संबंध येतील.
कुंभ राशी ग, स अद्याक्षर
मीन राशी द, च अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, दि. 21 जुलै 2019
भारतीय सौर, 30 आषाढ 1941
मिती आषाढ वद्य चतुर्थी 11 क. 40 मि.
शरतारका नक्षत्र 27 क. 25 मि.
कुंभ चंद्र 27 क. 40 मि.
सूर्योदय 06 क. 13 मि., सूर्यास्त 07 क. 17 मि.
दिनविशेष
1910 - महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती आणि रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा जन्म.
1930 - प्रख्यात मराठी साहित्यिक डॉ. रा. चि. ढेरे यांचा जन्म.
1930 - प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म.
1932 - मराठी लेखक द्वारकानाथ लेले यांचा जन्म.
1934 - माजी क्रिकेट खेळाडू चंदू बोर्डे यांचा जन्म.
2001 - तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन.
2009 - प्रख्यात शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन.