धनु राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शुक्र नवपंचम योगाचे मिळणारे सहकार्य प्रयत्नात उत्साह निर्माण करील. अनेक प्रांतात प्रवेश त्यामुळे सोपा होईल. चंद्र हर्षल त्रिकोण योग विद्वत्ता मिळवून देतो.
जन्मनाव भ, ध, अक्षरावर राहील.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, दि. 21 मे 2019
भारतीय सौर, 31 वैशाख 1941
मिती वैशाख वद्य तृतीया 25 क. 41 मी.
मूळ नक्षत्र 27. क. 31 मि. धनु चंद्र
सूर्योदय 06 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 7 मि.
दिनविशेष
1897 - खेळगडी मासिकाचे संपादक व लेखक काशीनाथ रावजी पालवणकर यांचा जन्म.
1928 - ज्येष्ठ कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म.
1979 - गांधीवादी व स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्त्या जानकीदेवी बजाज यांचे निधन.
1991 - माजी पंतप्रधान व काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष राजीव गांधी यांचे मानवी बॉम्बस्फोटात निधन.
1994 - मिस युनिव्हर्स म्हणून भारतातील पहिली महिला सुश्मिता सेन यांची निवड.
2003 - वेशभूषाकार गणपतराव जाधव यांचे निधन.