आज जन्मलेली मुले धनु राशीत असतील. मंगळ हर्षल लाभयोगाचं सहकार्य, विचार आणि प्रयत्न यातून यश मिळवून देतील. त्यात अनेक संधीचा समावेश होऊ शकेल. शिक्षणात प्रगती होईल. उद्योगाशी संबंध येऊ शकतात.
जन्मनाव भ, ध अक्षरावर राहील
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 22 मे 2019
भारतीय सौर, 1 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य चतुर्थी 26 क. 41 मी.
मूळ नक्षत्र 27. क. 31 मि. धनु चंद्र
सूर्योदय 06 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 6 मि.
दिनविशेष
1772 - समाजसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय यांचा जन्म.
1933 - लेखक, दिग्दर्शक वेद राही यांचा जन्म.
1982 - कलावंत गणेश सोळंकी यांचे निधन.
1989 - अग्नी क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण.
1991 - साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांचे मुंबई येथे निधन.
1995 - ज्येष्ठ शिल्पकार रवींद्र मेश्री यांचे निधन.
1998 - साहित्यिक डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन.
2003 - डॉ. नित्यनाथ उर्फ नितू मांडके यांचे मुंबई येथे निधन.