कर्क राशीतील मुलांचा जन्म 15 क. 13 मि. पर्यंत राहील. त्यानंतर मुले सिंह राशीत प्रवेश करतील. कार्यपद्धतीशी समरस होणे आणि कार्यपद्धती निर्माण करणे यातून मुलं चमकतील. त्यात बौद्धिक प्रांत, व्यवहार क्षेत्र राहील.
कर्क राशी ड, ह
सिंह राशी म, ट अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 01 कार्तिक 1941
मिती आश्विन वद्य दशमी 25 क. 09 मि.
आश्लेषा नक्षत्र 15 क. 13 मि. कर्क चंद्र 15 क. 13 मि.
सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 10 मि.
दिनविशेष
1879 - वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक भाष्यकार शंकर रामचंद्र राजवाजे यांचा जन्म.
1882- उद्योगपती वालचंद हिराचंद यांचा जन्म.
1891 - सहकार चळवळीचे प्रवर्तक वैकुंठभाई मेहता यांचा जन्म.
1923 - प्रसिद्ध प्रकाशक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म.
1924 - संगीतभूषण पं, राम मराठे यांचा जन्म.
1937 - हास्य अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता देवेन वर्मा यांचा जन्म.
1940 - ब्राझील सुप्रसिद्ध फुटबॉलपटू एडसन अरान्तेझ दो नासिमेंटो तथा पेले यांचा जन्म.
1945 - अभिनेता शफी इनामदार यांचा जन्म.