कन्या राशीतील मुलांचा प्रांत 16 क. 23 मि. पर्यंत असेल. पुढे तुळ राशीची मुले असतील. मंगळ-शनि केंद्र योगामुळे सावधानता व संयम यांची यशासाठी आवश्यकता राहील.
कन्या राशी प, ठ अद्याक्षर
तूळ राशी र, त अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार, 27 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 05 कार्तिक 1941
मिती आश्विन वद्य चतुर्दशी 12 क. 23 मि.
हस्त नक्षत्र 05 क. 41 मि. कन्या चंद्र 16 क. 31 मि.
सूर्योदय 06 क. 38 मि., सूर्यास्त 06 क. 07 मि.
नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन
दिनविशेष
1873 - 'जन पळभर म्हणतील हाय हाय' या गीताने सर्वांना वेड लावणारे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भा. रा. तांबे यांचा जन्म.
1904 - क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचा जन्म.
1920 - भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म.
1940 - इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आरती साहाचा जन्म.
1954 - प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म.
1968 - अणुभंजन व अणुशक्तीविषयक मूलभूत संशोधन करणाऱ्या लिझे मैटनर या शास्त्रज्ञ महिलेचे निधन.