कुंभ राशीतील मुलं 12 क. 19 मि. पर्यंत राहतील. त्यापुढे मीन राशीचा विभाग राहील. विद्वता, सरळता आजच्या मुलांच्या कार्यधर्म राहील. पदवी, परिवार, व्यवहार यामध्ये गुरू-शनिचे शुभ सहकार्य लाभेल.
कुंभ ग, स
मीन द, च अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, दि. 28 मे 2019
भारतीय सौर, 7 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य नवमी 13 क. 31 मी.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 18 क. 58 मि. कुंभ चंद्र 12 क. 19 मि.
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 10 मि.
दिनविशेष
1883 - देशभक्त, क्रांतिकारक विनायक दामोदर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म.
1903 - किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ उद्योगमहर्षी, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म.
1907 - स्वातंत्र्यसेनानी दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म.
1923 - तेलगु देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांचा जन्म.
1953 - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ, लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांचा जन्म.
1961 - प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा घोडे यांचे निधन.