मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-शनि शुभयोगाचे सहकार्य मिळेल. त्यातून यश संपादन करणारी कुशलता निर्माण होईल. यांत्रिक, स्थापत्य शास्त्राशी संपर्क येतील. परिचितांचा परिवार मोठा राहील.
मीन राशी द, च अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 29 जानेवारी 2020
भारतीय सौर 09 माघ 1941
मिती माघ शुद्ध चतुर्थी 10 क. 46 मि.
पूर्वा भाद्रपद नक्षत्र, 12 क. 13 मि., मीन चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 29 मि.
दिनविशेष
1853 - ओडिशा साहित्यातील प्रवर्तक मधूसुदन राव यांचा जन्म.
1870 - भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र हिक्लेचे बंगाल गॅझेट प्रसिद्ध.
1871 - कवी चंद्रशेखर तथा चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा जन्म.
1922 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांचा जन्म.
1963 - इतिहास संशोधक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.
1970 - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते तथा केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचा जन्म.