मीन राशीत जन्मलेली आजची मुले प्रगल्भ विचारांची धार्मिक प्रवृत्तीची राहतील. गुरुकृपेने याशतही प्रभाव राहील परिवार, व्यापार, प्रवास यात विशेष सहकार्य मिळेल.
मीन राशी द, य अक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 29 मे 2019
भारतीय सौर, 8 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य दशमी 15 क. 22 मी.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 21 क. 18 मि. मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 10 मि.
दिनविशेष
1953 - तेनसिंग नोर्के व एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट अत्युच्च शिखर सर केले.
1958 - आचार्च विनोबा भावे यांनी हजारो दलितांसह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला.
1972 - हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
2003 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी माई आंबेडकर यांचे निधन.
2007 -ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांचे निधन.
2010 - ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक ग. प्र. प्रधान यांचे पुणे येथे निधन.
2012 - जीवनविद्या मिशनचे संस्थापक सदगुरू वामनराव पै यांचे महानिर्वाण.